Saturday, November 18, 2006

थोडा 'चहा'टळपणा :-)

आज माझ्या roommate नी मला सकाळी सकाळी (Weekend ला साडेनऊ म्हणजे 'सकाळी सकाळी' च असतं) गरम गरम चहाचा कप हातात दिला! देव तिचं कल्याण करो... वाफाळता चहा (तोही आयता!) आणि टोस्ट... आणखी काय हवं आयुष्यात? :D चहा हे जगातलं अंतिम सत्य आहे... बाकी सगळं मिथ्या!

घरी सकाळ-संध्याकाळ आईबरोबर चहा व्हायचा. सकाळी ती करायची म्हणून तिला हवा तसा गोडसर, आणि मोजून पाऊण कप. संध्याकाळी ती शाळेतून दमून यायची म्हणून मी चहा करायचे... मला हवा तसा: पाणीदार, दूध कमी, साखर कमी, भरपूर आलं आणि मोजून साडेसात मिनीटं व्यवस्थित उकळलेला. शिवाय 'पाऊण' कपाचं बंधन नाही. स्वतःचा कप तुडुंब भरलेला आणि वर आई "मला एवढा नको गं बाई, कमी कर जरा.." म्हणणार म्हणजे तिच्यातलाही थोडा! :D आमच्या कॉलेजच्या canteen मध्येही झकास चहा मिळायचा. PL चालू असताना Reading Room मध्ये अभ्यासाला जायचे तेव्हा दुपारी डबा खाल्यावर हमखास येणारी झोप टाळण्यासाठी म्हणून सगळेजण चहाला जायचो, ते तासभर गप्पा कुटूनच परत यायचो. अगदीच उनाडक्या करायच्या असतील तर college बाहेरच्या विल्सनच्या टपरीवरचा 'कटिंग' चहा! त्या टपरीवर चहाबरोबरच सिगारेट फुंकणे हा मुख्य उद्योग चालत असल्याने पूर्वी मुली तिथे फारशा जात नसत. पण तिथे मिळणाऱ्या फक्कड चहाचा आस्वाद घेतल्यावर ती टपरी कॉलेजच्या समस्त भगिनीवर्गासाठी खुली करण्याचं सत्कृत्य अस्मादिकांनी केलं! आमच्यासारख्या सभ्य (:D) मुलींची वर्दळ वाढल्यावर, फुंकणारी मंडळी हळूहळू तिथे दिसेनाशी झाली. पुण्यात University Canteen (म्हणजे ते Garden Canteen - खरे वाङमय भवनाजवळचं.... Publication Department जवळचं indoor नव्हे!) मधला चहा मला सगळ्यात आवडायचा. मात्र कुठ्ल्याही उडप्याच्या हॉटेलात चहा मागवला तर बरेचदा निराशाच व्हायची. त्यात तो Tea Bags चा 'Dip-dip' चहा दिला की माझी चिडचिडच व्हायची. मग समोरच्या 'अमृततुल्य' मध्ये जाऊन परत एक-एक चहा घ्यायचा, हा ठरलेला कार्यक्रम!

इथे आल्यापासून चहा दुरावलाय... एकतर माझ्याइतकं आवडीने आणि कौतुकाने चहा पिणारं दुसरं कुणी नाही मित्रमंडळींपैकी. इथे जनता 'स्टारबक्स' ची कॉफी पिते. कॉफीचं मला वावडं नाही, पण चहा तो चहाच! चहा ठेवून तो उकळेपर्यंत वाट पहाण्याइतका वेळही नसतो बरेचदा... कॉफी पटकन Microwave मध्ये देखिल होते म्हणून तिला preference दिला जातो. असाच weekend ला कधीतरी चहाचा योग जुळून येतो... weekendचं कसं सार्थक झाल्यासारखं वाटतं.... :)

12 comments:

गिरिराज said...
This comment has been removed by a blog administrator.
गिरिराज said...

अरेरे! मला परवाच चहा या विषयावर लिहावेसे ्वाटले आणि मी आज लिहू उद्या लिहू असे करत बसलो आणि तू पिऊनही मोकळी झालीस. मी कही चहावेडा नाही तसाही!
असो! जमले तर लिहीन.. ट्युलिपचे म्हणणे पुन्ह खरे पटले! :)

Priti said...

आई पण तुझी company मिसते चहा पीताना.. मी तर पीत नाही.. :) आजच आठवण झालेली तिला. आणि तू चहा पीत नाहीस हे वाचून आश्चर्य वाटल.. बोच्चारा चहा तुला miss करत असेल.. :D

प्रिया said...

Giri, hee HDA kaay bhaanagaD aahe re? ... aaNi Tulip kaay mhaNaalee hotee?

Priti, shuddhalekhan baghaa jaraa! ... chahaa 'pitaanaa'... "peetaanaa" navhe... aaNi "bochchaaraa" kaay? lahaan asataanaach aikala asatas maajha tar aaj.... jaau de jhaala!

(Americet asale mhaNoon kaay jhaala, 'taaigiree' karaNyaachaa ekahee chance soDat naahi mee ajunahee! ;-) )

Mrinal said...

no comments!!! (milk-lover ajun kai mhaNanar?:) )

Gayatri said...

मस्त! तू इतकी 'चहांबाज' आहेस हे माहिती नव्हतं :D आणि इथे पण ताईगिरी? :O बरं झालं मी प्रीतीच्या जागी नाहीये ते!
आणि हो, उद्या रूममेटने परत चहा दिला ना, तर थोडासा बशीत ओत आणि त्यात बुडी मार. HDA म्हणजे हितगुज दिवाळी अंक असावा, अशी माझी within the limits of Heisenberg's principle खात्री आहे.

Priya said...

गायत्री माते! HDA म्हणजे काय ते ठाऊक आहे गं... पण गिरीने माझ्या post वर HDA या नावाने प्रतिक्रीया का लिहावी? :)
आणि तू प्रीतीच्या जागी असतीस, तरी तूच माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या असत्यास, अशी मला पण Heisenberg की कोण तो... त्याच्या principle च्या limits मध्ये खात्री आहे! :D

प्रिया said...

अहो milk-lover... तुमचा नवरा किती चहा-lover आहे बघा! बिचारा... कुणी company पण नाही त्याला चहा प्यायला! तू चहा पीत नाहीस, कॉफी पीत नाहीस... तुला ठाऊक आहे का तू कुठल्या आनंदाला मुकते आहेस ते? :)

Dhananjay said...

Chaha varche sagle lekh mala atishay avadtat.

'Chahabaj' Dhananjay

Saee said...
This comment has been removed by the author.
Saee said...

poorvi kadhitari chaha viruddha coffee asa vaad chalala astana mazya eka mitrane ek 'atul'neey comment keli...
"coffee ha shabda ulta karal tar hote kay 'fika'. pan chaha ha shabda ulta kara rahil kay, "hach"
[:)]

Dk said...

:D :D aayta chaha haatat >> sarkhe dusre sukh naahi hech khre