आज आईचं पत्र आलं! तसं फोनवर बोलतोच आम्ही बरेचदा... कधी कधी चॅट पण करतो, मेल लिहीतो एकमेकींना... पण माझ्या वाढदिवसाचं निमित्त साधून या वेळेला तिने मला पत्र लिहीलं. तिने ते post केल्याचं सांगितल्याच्या चौथ्या दिवशी मी रूममेटकडून मेलबॉक्सची चावी आणि ते चेक करायची तिच्यावर ढकललेली जबाबदारी, स्वतःकडे घेतली! :-) रोज सकाळ-संध्याकाळ उत्सुकतेने मेलबॉक्स उघडून पहात होते. आज संध्याकाळी ते पत्र हातात आल्यापासून, म्हणजे गेल्या चार तासात पाच वेळा वाचून झालंय ते... :-) आणि सोबत बहिणीने पाठवलेलं अतिशय 'senti' greeting card सुद्धा तीनदा वाचलं! असं काय असतं बरं पत्रात? - रोज तिच्याशी बोलते मी, पण आज तिचं पत्र वाचून अगदी तिला भेटल्यासारखं वाटलं! इतका आनंद झाला की सगळ्यांना ओरडून सांगावसं वाटलं... पण एकालाच सांगितलं, फोन करून. हल्ली पत्रा-बित्राचं फारसं कौतुक राहिलेलं नाही कुणाला. माझी excitement फारशी कुणाला कळेल असं वाटलं नाही.
खरंतर त्या पत्रात पुन्हा पुन्हा वाचावं असं वेगळं काहीच नाही. आईच ती - लिहून लिहून काय लिहीणार? "तब्बेतीची काळजी घे. जास्त जागरण करत जाऊ नकोस. कामाचा फार ताण घेऊ नकोस. थंडीत पुरेसे गरम कपडे घालत जा. नीट अभ्यास कर " - वगैरे typical आईछाप मजकूर आहे! :D तशी माझी आई पण अगदी साधी, रोखठोक आणि कणखर. मी इकडे यायला निघाले त्या दिवशी packing वगैरे तयारीच्या गडबडीत, गळ्याशी आलेला हुंदका तिने कळेल न कळेल असा परतवून लावल्याचं आठवतंय. आताही "एकंदरीत तू तिकडे रुळलीयेस याचं समाधान वाटतं, पण तुझी उणीवदेखिल प्रकर्षाने जाणवते" - एवढया एका वाक्यात ती मनातलं सगळं बोलून जाते... बाकी पत्रात सगळ्या वर सांगितल्याप्रमाणे आईछाप सूचना! तरीही ते पत्र चार वेळा आधाशासारखं वाचल्यानंतर पापण्या किंचीत ओलावल्याच... इतक्या दिवसांनी आईला भेटल्यावर तेवढं व्हायचंच, नाही का? :-) मी नाही बुवा तिच्याइतक्या कणखर मनाची!
इंदिरा संतांची ही सुरेख कविता आठवली आज:
पत्र लिही पण
पत्र लिही पण नको पाठवू
शाईमधुनी काजळ गहिरे
लिपीरेषांच्या जाळीमधुनी
नको पाठवू हसू लाजरे
चढण लाडकी भुवयीमधली
नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तिळ गालीचा
पूर्णविरामाच्या बिंदूतून
नको पाठवू अक्षरातुनी
शब्दामधले अधिरे स्पंदन
कागदातुनी नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण
नको पाठवू वीज सुवासिक
उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा
सांगितले मी: तू हट्टी पण...
पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्र पुढचे त्यानंतर पण
वाचायाचे राहून जाते
-इंदिरा संत ('रंगबावरी')
Subscribe to:
Post Comments (Atom)
13 comments:
kaku che patra mi pan 3-4 wela tari wachte... Dar warshi toch majkor asto tari suddha mazya, Sandeepchya wadhdiwasala and amchya Anniversaryla tichya patrachi utsuktene waat pahat aste mi. Sandeep che letters mi usually open karat nahi but tyachya B'day la alele kakuche patra mi wachlya shiway tyala det nahi :)
वा! तुझ्या-माझ्या सारख्या सगळ्यांना येणारा "senti" अनुभव आहे हा. आणि ही माझी पण खूप आवडती कविता आहे!
घरुन आलेली पत्रे हा एक सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि त्याला इतक्या सुन्दर कवितेची साथ!
दुग्धशर्करा योग म्हणतात तो हाच असेल :)
chhan lihilayes. :) kharach patranchi maja kahi vegalich, e-mail ani chat ne tyachi jaga nahi ghetali jaat.
patra lihI paNa- khup aavadla.
kavita aaNi lekhana donhI.
wa! kavitaa aaNi lekh donhi aavaDale.
छान लेख आहे. पत्रांची मजा काही औरच. त्याची सर इतर कशालाही येणार नाही. मीही आवर्जून घरी किंवा मित्रांना पत्र पाठवतो.
धन्यवाद सगळ्यांना! :-) इतक्या जणांचा जिव्हाळ्याचा विषय असेल हा, असं वाटलं नव्हतं लिहीताना!
U write really well..keep it up!! I loved the poem by indira sant..khup divsanantar marathitun kahitari chan vachayala milal....lihit raha..
Ha ani adhiche lekh avadale. Patracha Vishay nighalay mhanun.. GA Kulkarniche 'Bakhar Bimmachi' navache lahan mulanche pustak ahe. tyatli 'Patra' hee katha apratim. Nostalgic banavnari.... tyachi athavan zali..
Dhananjay
Baryach mhanje far far varshanpurvi jevha mi ekta hoto .. gharapasun dur prathamach ... ek jababdari khandyavar gheun aalela .. tevha gharun yenyara patranchi ashich waat baghaycho .. this poem reminded me of that. aata mi parat ekta aahe .. and your blog struck a cord ... took me back to those days ... god bless you ..
hmmm :)
Khup chaan... Kharech aahe.. Je ani jitkaa mhanun patra tun vykta hota yeta titka email ani messages vr nahi yet..Halli social media prasta vadhlay.. Pan junya patranchi sar kashala mhanun nahi
Post a Comment