Tuesday, November 21, 2006

रडू नको बाळा, डाळिंब देते...

परवा रात्री उशीरा असंच एका अर्ध्या तासाच्या assignment शी दोन तास खेळत बसले होते... It was one of those slow days... when you can't get anything done! म्हणजे उदास वगैरे नव्हते, पण उगाच कसले तरी विचार येत होते मनात. मध्येच आजीची आठवण आली. एक गाणं म्हणायची ती... नातवंडांना झोपवताना... माझ्या धाकट्या बहिणीसाठी, धाकट्या चुलत भावंडांसाठी तिला ते म्हणताना मी कित्येकदा ऐकलं होतं. कधीतरी लाडात येऊन मीपण तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले, तर माझ्यासाठी पण म्हणायची. आयुष्यभर कष्ट करून खरखरीत झालेला तिचा हात माझ्या केसांतून फिरवत... काय होतं बरं ते गाणं..? खूप प्रयत्न केला आठवायचा, पण काही केल्या आठवेचना! मग मी अस्वस्थ झाले. कशातच लक्ष लागेना....

मी सहावीत असताना आजी गेली. त्याआधी पण ती आमच्याकडे आणि सगळ्या काकांकडे जाऊन-येऊन असायची. त्यामुळे तिचा सहवास सलग फार दिवस कधीच मिळाला नाही. पण जेवढा मिळाला त्यातलं बऱ्यापैकी आठवतंय.... तरी सहावीत म्हणजे मी लहानच होते की! इतरांसारख्या आजी-आजोबांच्या आठवणी माझ्यापाशी नाहीत म्हणून मला नेहमीच खंत वाटते. आजोबांना तर मी पाहिलं देखिल नाही... आईच्या आई-वडिलांचादेखिल फार सहवास घडला नाही. मी कुठल्या आनंदाला मुकले, मुकते आहे याची मला चांगलीच जाणीव आहे!

ते गाणं काही केल्या आठवेना... चैन पडत नव्हती. घरी जाऊन झोपावं तरी पटकन शांत झोप लागेल असं नाही. आईला फोन करावा का?... तिला आठवेल नक्की... ! आईने खरंच विचारल्या विचारल्या लगेच सांगितलं ते गाणं:


रडू नको बाळा, डाळिंब देते
रडू नको बाळा, खेळायला नेते
मोत्याचा चेंडू यमुनेत गेला
धुंडीत धुंडीत उशीर झाला....


मला अगदी आजी म्हणायची त्या चालीत, तिच्या आवजात लगेच आठवलं ते गाणं... गुणगुणतच घरी गेले. शांत झोप लागली... आजीच्या मांडीवर लागायची तशी!

10 comments:

Mints! said...

आजी हे नातेच असे असते ना? आठवण आली की डोळ्याच्या कडा ओले करणारे!
छान लिहिलेस.

Unknown said...

vaa

Priti said...

:)

Vishal said...

coool. U got some skills girl. keep it coming..

Mrinal said...

aajichich nahi tar saglya mothyanchi athwan zali ha post wachun! Too senti! Tyanni aplya sathi evdhe kele aste ani apan tyachi ajibat paratfed karu shakat nahi . Waeet watata yache kadhi kadhi...

Priya said...

Radhika, dhanyavaad! :-) Do I know you?

Minoti, Mrinal... agadee!

Priti, Vishal - Thanks!

प्रिया said...

मला आजी म्हणायची ते "एक पाव नाचव रे, गोविंदा... घागरीच्या छंदा.." सुद्धा थेट तिच्या आवाजात आठवतं अजून. किती गोड वाटायचं ऐकायला! :-)

Priti said...

malaa kaahIch aaThawat naahI.. :(

Priti said...
This comment has been removed by the author.
.. said...

मला वाटतं "परम-मायाळू" होणं ही प्रत्येक आजीची पहिली requirement असावी :)
पण खरंच.. आजीच्या तोंडून ते "मधूसूदना, दशरथा नंदना, निद्रा करी बाळा" ऐकलं की खरंच इतकी छान झोप लागायची ना की बाकी काही काही म्हणून लक्षात यायचं नाही!
जबरी लिहितेस .. !