Thursday, November 16, 2006

एक 'सुरेल' अनुभव

रविवारी आमच्या विद्यापीठात भारतीय शास्त्रीय संगीताची मैफिल झाली. टस्कालूसासारख्या छोट्या University Town मध्ये असं काही बघायला/ऐकायला मिळेल, असं येण्यापूर्वी वाटलं नव्हतं. त्यामुळे या कार्यक्रमाबद्दल कळलं तेव्हा मला अगदी आश्चर्यमिश्रीत आनंद झाला. कार्यक्रम माझ्या वाढदिवशी होता, त्यामुळे स्वारी आणखीनच खुश! शास्त्रिय संगितातलं मला फारसं कळत नसलं तरी ते ऐकायला मात्र मला मनापासून आवडतं. नृत्यामुळे ताल-पद्धतीशी थोडा फार परिचय झालेला. शिवाय पुण्यात असताना माझा एक 'कानसेन' मित्र होता. त्याच्यामुळे कुठल्या रागात कसे सूर वापरतात, कुठल्या रागाचा mood कसा, feel कसा, कुठल्या वेळी गातात, कुठल्या गाण्यात कुठल्या रागाच्या छ्टा दिसतात वगैरे गोष्टी मला थोड्याफार कळू लागल्या. मी मुळात 'शब्दवेल्हाळ' (हा त्याचाच शब्द!) . म्हणजे कुठलंही गाणं ऐकताना त्यातल्या सूरांपेक्षा शब्दांवर माझं जास्त लक्ष! माझी सगळ्यात आवडती गाणी, त्यातल्या अर्थपूर्ण शब्दांमुळेच माझी आवडती आहेत. त्यामुळे माझी सूरांशी मैत्री करून देणं, त्याला अंमळ अवघडच गेलं! :-p पण आता मात्र सूरांशीदेखिल माझी बऱ्यापैकी गट्टी जमली आहे, असं म्हणायला हरकत नाही... :)

परवाच्या कार्यक्रमात बासरी आणि सतारीची जुगलबंदी होती. दोन्ही वाद्यांचे सूर मला फारच मोहक वाटतात. आनंदी, शांत, उदास, दुःखी... सगळ्याच प्रकारचे सूर या दोन्ही वाद्यांतून कमालीच्या सहजतेने निघू शकतात, असं मला वाटतं. बासरीच्या साथीला मृदंग आणि सतारीच्या साथीला तबला होता. कार्यक्रम खूपच बहारदार झाला. सगळेच कलाकार अगदी उत्तम होते. मला विशेष लक्षात राहिली ती त्यांनी सुरूवातीला वाजवलेली "वातापि गणपती" ही कर्नाटक संगीतातली 'हंसध्वनी' रागातली रचना. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाउन त्याच चालीवरचं "दाता तू गणपती गजानन" हे मराठी गाणं आणि "जा तोसे नाही बोलू कन्हैय्या" हे हिंदी गाणं पुन्हा पुन्हा ऐकलं ... :)

पण त्या कार्यक्रमानंतर माझ्या घरी असलेल्या माझ्या शास्त्रीय संगीताच्या लहानश्या collection ची मला फारच आठवण यायला लागली. सगळ्यात जास्त miss करतीये ते त्याच मित्राने दिलेल्या एका संतूर आणि बासरीच्या एका composition ला. मारवा आहे... माझा लाडका! पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरीप्रसाद चौरासिया... composition स्वर्गीय आहे हे वेगळं सांगायला नकोच! कसंही करून तातडीने ते मला internet वरून पाठवण्याकरता मी त्याला या weekend पर्यंत मुदत दिली आहे... :) कुणाला ऐकायचं असेल तर मला पुढच्या आठवड्यात मेल करा :)

10 comments:

Unknown said...

That was neat!

Priti said...

सहीए.. !!

Gayatri said...

mee maajhee maagaNee aattaach nondawatey ga. 'composition' mail kar.

'waataapi'..pu.la. nchyaa "asaa mee asaa mee' madhye aahe, aaThawala?

प्रिया said...
This comment has been removed by the author.
प्रिया said...

'वातापि...' 'असामी' मध्ये??? बघ मला पु. ल. ऐकून किती दिवस झालेत... आजिबात आठवत नाहीये! :( कधी आहे गं?

मित्राने मला शेंडी लावली नाही तर तुला नक्की मिळेल ते compostion... :)

Gayatri said...

aga, the part where D.B.Joshi goes to santacruz to meet kaikini gopalrao's 'Gurudev'. there this southie guy "aapalyaa aawaDatyaa mhashelaa bolaawaNaaraa reDaa jitakyaa goaD aawaajaat rekel" tasa te 'waa~taapi gaNapati bhaje'am ' gaaNa mhaNat hota.

Nandan said...

Hi Priya, Lekh aavadlaa. Tu mala te composition mail karoo shakasheel ka?

Priya said...

Thanks, नंदन!
मित्राने तर मला ते पाठवलं नाहीये अजून. पण भारतात माझ्या घरी आहे ते. धाकटी बहीण पाठवू शकते. Problem असा आहे की ते मेलला attach होणार नाही. Size मोठी आहे. माझ्या आठवणीप्रमाणे 25-30 MB तरी असेल. कुठे server space असेल तर सांग. मी upload करायला सांगते.

Nandan said...

Hi Priya. Rapidshare.de kinva even better would www.cooltoad.com yavar upload karataa yeu shakel. Blogs var audeo play karaNyaasaaThee www.odeo.com hee ek site aahe, paN tyaache limit malaa maaheet naahee.

Anup said...

Mala pan Composition pahije.
Maza mail id aahe
anuphshah@hotmail.com
Mi pan ithe US la rahul khoop miss karat aahe Shastriya sangit