Friday, January 5, 2007

एका दाटून आलेल्या संध्याकाळी...

एका दाटून आलेल्या संध्याकाळी आमच्या university च्या campus मध्ये घेतलेले हे फोटो. मला photography मधलं काहीही कळत नाही. 'घेतला camera आणि केलं click' असेच हे फोटो आहेत, तेव्हा please bear with them! :-)





मी library च्या porch मध्ये उभं राहून ज्या 'मोठ्ठ्या' लॉन्स वर कोसळणारा पाऊस पाहिला ते हे लॉन्स, अर्थात 'Quad' . इथे रोज पहाटे आणि संध्याकळी बरेच लोक jogging किंवा walk ला येतात. संध्याकाळी आई-वडील लहान मुलांना खेळायला घेऊन येतात. बरीच मुलं सायकल चालवताना दिसतात. संध्याकाळी department मध्ये कंटाळा आला, की Gorgas library च्या Coffee shop मधून कॉफी घेऊन यायची, आणि कॉफी घेत घेत Quad वर फेरफटका मारायचा, हा माझा आवडता कार्यक्रम! समोर दिसणारा उंच tower म्हणजे Denny Chimes. त्यातून थोड्या थोड्या वेळाने (नेमक्या किती ते माहित नाही) छान आवाज येतात.





Quad, पुन्हा एकदा! Fall season च्या सुरुवातीला ही सगळी झाडं लाल-पिवळ्या-नारिंगी पानांनी डवरलेली असतात. Fall colors नी नटलेलं quad विलक्षण सुंदर दिसतं. आता पानगळ झाल्यावर हीच झाडं अगदी भकास दिसू लागतात. Summer मध्ये संध्याकाळी गजबजून जाणारं Quad हिवाळ्यात मात्र अगदी उदास वाटतं...





Gorgas Library... UA मधली सगळ्यात देखणी आणि दिमाखदार वास्तू! सध्या Holiday season साठी सजलेली! Gorgas च्या पायऱ्यांवर किंवा porch मध्ये उभं राहिल्यावर आख्खं Quad डोळे भरून बघता येतं. इथेच उभं राहून Quad वर कोसळणारा पाऊस पाहिल्याची आठवण आजही माझ्या मनात ओलावा निर्माण करते. Gorgas च्या अगदी समोर, Quad च्या दुसऱ्या टोकाला Denny Chimes आहे. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर तो tower देखिल इथून फार सुरेख दिसतो.




Gorgas च्या porch मधून दिसणारी Denny Chimes. माझं department Quad च्या एका बाजूला आहे, तर ऑफिस दुसऱ्या बाजूला. त्यामुळे दिवसातून एकदा तरी Quad ओलांडून पलिकडे जावं लागतंच. आजूबाजूची झाडं, लॉन, त्यावर धीटपणे बागडणाऱ्या खारी, Gorgas, Denny Chimes, सगळ्याकडे पहात चालायला खूप छान वाटतं...




Denny Chimes च्या जवळून टिपलेली Gorgas.





UA चा मानबिंदु - Denny Chimes, एका दाटून आलेल्या संध्याकाळी....

12 comments:

Unknown said...

Neat!!

DKDON said...

Mast watle!!! Really intriguing article!!! Keep up writing such good articles.

Mrinal said...

cool... nice pics! Ekdam best!

Mrugjal said...

mala foto'npeksha tumchya Bhavana'nche chitran khoop aavadale.
fotos'pan chaan aahet

Priti said...

sahiye!

Prasad Chaphekar said...

masta photo ahet.. bear withem asa kay lihila ahes? btw, why don't u start a photo blog? (assuming u haven't done already!!)

Priya said...

धन्यवाद सगळ्यांना! :)

प्रसाद,
I don't have a photo blog already. मला खरंच फोटो काढता येत नाहीत (गायत्रीच्या शब्दात सांगायचं तर, फोटोसाठी दात काढता येतात फक्त!! :D) हे फोटो चांगले आले असतील तर ते by fluke आलेत! माझ्याकडे कॅमेरा पण नाहीये सध्या. पण शिकायची हौस चिकार आहे. सध्या फोटोग्राफी चे प्रयोग लायब्ररीतून कॅमेरा उसना घेऊन चालू असतात अधून मधून. I hope someday I too will be able to make good pictures, and have a photo-blog!

स्नेहल said...

sakhe :)

tuza blog aahe he aaj ch kalal..ani sagala blog wachun kadhala... sundar lihites!!!
UA madhale photo pan chhaan...
tu sahdya HG/ orkut kuthech nasates... ata blog war ch bhetat jau :)

प्रिया said...

बडे!! तुझ्या ब्लॉगवर उत्तर दिलंय बघ.... :)

abhijit said...

technically ..jar tu pahila photo ajun 10 pavale pudhe jaun ghetla asatas tar ajun catching aala asataa.

malahi jasti kalat nahi. pan to ujavya koparyatala khalacha rasta unwanted aahe..chotassa rastyacha tukada.

blog sundar aahe tujha.

Abhijit Dharmadhikari said...

क्या बात हैं! मझा आला! फोटो एस्से आवडला! छाया-प्रकाशचित्रांच्या माध्यमातून व्यक्त होण्याची ही उत्कटता फार लोभसवाणी असते.

क्लिकते रहो...:-)

प्रभाकर कुळकर्णी said...

मी आयुश्यात पहील्यान्दाच तुम्हा लोकान्चे लिखान वाचत आहे . कौतुकास्पद लिहीता तुम्ही लोक . फ़ार मागे पु लं ,ना स ईनामदार वगैरे वाचले होते . सावरकर चे चरीत्र सुध्धा . पन आता तुम्हा लोकान्च्या प्रतीभा पाहून तुम्ही पन काही कमी नाही आहात असे वाटते आहे . कीप इट अप .

प्रभकर कुळकर्णी