"उद्या छत्री जवळ ठेव बरं! पाऊस पडणार आहे."
"च्यामारी, म्हणजे सकाळी आठच्या class ला पावसापाण्याचं जावं लागणार!"
"नाही, नाही... सकाळी नाही. दुपारी दोन ते पाचच्यामध्ये पडणार आहे."
.... छ्या! हा काय पाऊस झाला? Weather.com च्या सांगण्यानुसार शॉवर चालू करावा तसा पडणार आणि वेळ झाली, की पुन्हा शॉवर बंद केल्यासारखा थांबणार! तोवर सगळेजण आपापल्या ऑफिसात स्वतःला कोंडून घेणार. Meetings वगैरे शक्यतो आधीच उरकून घेणार. ज्यांचं ऑफिस basement मध्ये आहे, त्यांना तर कळणार पण नाही बाहेर पाऊस पडतोय की काय ते.... किती boring आहे इथला पाऊस! बरं, पाऊस पडून गेल्यावर पण पावसाच्या काही विखुरलेल्या खाणाखुणा, ओल, चिखल, काही नाहीच!! रस्ते लगेच कोरडे... सगळं लगेच पूर्वीसारखं....
पावसाने कसा 'अवेळी' येऊन 'धिंगाणा' घातला पाहिजे! :) किंवा आजिबात ध्यानीमनी नसताना, मस्त ऊन पडलेलं असताना, अचानक दाटून येऊन रस्त्यात 'गाठलं' पाहिजे आपल्याला! मग आपण थोडं भिजत, घाईघाईने जाऊन कुठेतरी आडोसा शोधायचा, उशीर होतोय वगैरे सगळं विसरून नुसतं पावसाकडे बघत रहायचं. पाऊस जरासा कमी होऊन फक्त थोडी रिपरिप उरेल, तेव्हा ओढणी डोक्यावर घेऊन उगाचच पावसापासून जपण्याचा आव आणत, ती भुरभुर हलकेच अंगावर झेलत, भिजत भिजतच घरी जायचं. मग छानपैकी आलं घातलेला चहा प्यायचा :) ! इथे च्यायला पावसाकडे बघायची सुद्धा पंचाईत.... Graduate Office च्या एकुलत्या एका इवल्याश्या खिडकीतून, blinds किलकिल्या करून, समोरच्या दोन इमारतींच्या मध्ये दिसेल एवढाच पाऊस! :( आणि इथे पावसाळा पण नाही.... दोन-तीन महिने उकाड्याने त्रासून जाऊन पावसाची वाट बघणं, मग मोन्सून कुठपर्यंत आलाय ते वाचायला उत्सुकतेने पेपरची पानं चाळणं, पहिला पाऊस झाला की मग हायसं वाटून मस्तपैकी भिजणं, लगबगीने छ्त्र्या-रेनकोट वगैरे बाहेर काढणं, ठिकठिकाणी लागणाऱ्या पावसाळी सेल मधे एका हातात छत्री घेऊन हौसेने खरेदी करणं, काहीच नाही!! मला आठवतं, पहिल्या पावसाच्या वेळेस हमखास माझी परीक्षा असायची! शेवटचाच पेपर राहिलेला असायचा बहुतेकवेळा.... पण अभ्यासाचं कितीही tension असलं तरी एकदा आभाळ भरून आलं, आणि 'जोराचा वारा-मातीचा वास' वगैरे सहित पावसाची चिन्हं दिसू लागली की अभ्यासात लक्षच लागायचं नाही! दुसऱ्या दिवशी परीक्षा म्हणून आई भिजू द्यायची नाही. पण तरी हळूच बाहेर ओट्यावर जाऊन थोडासा पाऊस अंगावर झेलायचा, मग खिडकीतून बाहेरच्या झाडा-झुडपांवर मनसोक्त कोसळणारा पाऊस बघत उगाचंच थोडं हळवं व्हायचं, पाऊस थांबल्यानंतरही हवेत दरवळत राहिलेला त्याचा सुवास श्वासांत भरभरून घ्यायचा; आणि मग संध्याकाळी अंधार झाल्यावर MSEB च्या कृपेने वीज गेली(ती काय चार शिंतोडे पडले तरी जातेच!) की दुपारभर वेळ फुकट घालवला म्हणून emergency light च्या उजेडात पहाटेपर्यंत अभ्यास करायचा, हे दर वर्षीचं ठरलेलं असे!
इथे म्हणजे वर्षभर केव्हाही पाऊस पडणार, अर्थात आधी weather.com वर कळवूनच.... आणि एखादं routine काम उरकून गेल्यासारखा जाणार! पावसाळा वगैरे काही नाही! :( फारच नाराज होते मी इथल्या पावसावर. परका देश, परकी माणसं, अचानक आलेला एकटेपणा, सगळ्याशी जुळवून घेता घेता पुरती भांबावले होतेच मी... पण इथे पावसानेदेखिल पावसासारखं वागू नये? तेवढ्यात एकदा, दुपारी ऑफिसमधून निघून class ला जात असताना अचानक पावसाने गाठलंच मला. मग धावत धावत जाऊन Gorgas Library च्या porch मध्ये आडोश्याला उभं राहून बघितलं, तर फार काही वेगळा नव्हता अमेरिकेतला पाऊस! समोरचं मोठ्ठं लॉन आणि त्याच्या कडेकडेने रांगेत उभ्या असलेल्या मेपल वृक्षांवर कोसळणारा पाऊस डोळेभरून पाहून घेतला. पावसाशी नव्याने मैत्री व्हायला हे निमित्त पुरेसं होतं. तो ओसरल्यावर जरा जरा भिजत पाच मिनीट उशीरा वर्गात पोचले, आणि मग मला कुडकुडताना पाहून मास्तरांनी AC बंद केलं, तेव्हा खूप दिवसांनी आठवणींतल्या पावसाला भेटल्यासारखं वाटलं!
आता हळूहळू इथला पाऊसही आवडायला लागलाय.... :) १५-२० दिवस कोरडे गेले की मीच weather.com वर चक्कर मारून बघते, पुढचा पाऊस केव्हा आहे ते! कधी दुपारी काम करता करता अचानक खिडकीच्या तावदानावर थेंबांचा आवाज ऐकू यायला लागला की, आनंदाने blinds उघडून बघतेच! कधी कधी पाऊस पडत असताना उगाचंच छ्त्री घेऊन समोरच असलेल्या Starbucks मध्ये जाऊन कॉफी घेऊन येते :) आजही पावसाची आठवण येतीये.... बरेच दिवस झाले पाउस पडून...
पाऊस किती दिवसात फिरकला नाही
पाऊस कुणाला कधीच कळला नाही
पाऊस ऋतुचे निमित्त करूनी दिसतो
पाऊस पापणीआड... कधीचा.. असतो...
- सुधीर मोघे
पावसाइतका सख्खा मित्र मला भेटलेला नाही अजून!

ही नोंद 'शब्दबंध' या मराठी ब्लॉग अभिवाचनाच्या ऑनलाईन कार्यक्रमात वाचली गेली.
13 comments:
खूप छान लिहीली आहे नोंद. शेवटची सुधीर मोघेंची कविताही सुरेख.
खरं आहे. पाऊस हा भारताबाहेरच्या लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय होऊच शकत नाही असं मलाही वाटतं. पण पावसावर लिहावं तेवढं थोडंच आहे.
:) tuze maastar kanawaaLU aahet! 'paawasaane "aweLee dhingaaNaa" ghaatalaa paahije'.. paTalach agadee!
nice one. I love rain too and feel very happy to be here in USA as it rains 2-3 days in a week.
मस्त लिहिलं आहेस प्रिया.
mast lekh aahe. aavaDalaa.
:) छान !
Ithla paus is too sophisticated to produce maaticha waas and chikkhal :)
धन्यवाद, सगळ्यांना! :)
विशाल, इथेही काही काही लोकांना पाउस फार आवडतो. पण इथला पाऊस भारताइतका enjoyable नसल्याने त्यांना तितका जिव्हाळ्याचा नसावा कदाचित.
पावसाबद्दलच्या या दोन नोंदी लिहील्यापासून इंदिराबाईंची ही कविता मनात घोळत होतीच. गेल्या आठवडाभरात चार-पाच वेळा स्वतःशीच म्हणून झालीये... :) पण घरी, lab मध्ये, दोन्हीकडे एकटीच असल्याने ऐकून 'वाह!' म्हणायलाही कुणी नाही... आज अगदीच राहवलं नाही, आणि जरा निरुद्योगही करावासा वाटला, म्हणून इथे लिहीत आहे :)
नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली ॥
नको नाचू तडातडा असा कौलारावरून
तांबे, सतेली, पातेली आणू भांडी मी कुठून ॥
नको करू झोंबाझोंबी माझी नाजूक वेलण
नको टाकू फूलमाळ अशी मातीत लोटून ॥
आडदांडा नको येऊ झेपावत दारातून
माझं नेसूचं जुनेरं नको टाकू भिजवून ॥
किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐक ना
वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आण ना ॥
वेशीपुढे आठ कोस जा रे आडवा धावत
विजेबाई कडाडून मागे फिरव पांतस्थ ॥
आणि पावसा, राजसा, नीट आण सांभाळून
घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन ॥
पितळ्याची लोटीवाटी तुझ्यासाठी मी मांडीन
माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन ॥
ithe lihilis hoy tu kavita. mi shodhate aahe sagalikaDe :(
sundar!!!
Zakkas lihite aahes tu..But we do not have rain here in India .Paus aala tari Pani, nahi ala tari dolyat pani....
Priya,
Chaanach lihila ahes! :)...mee hi madhe aplya pawsa baddal nostalgic jhale hote tevha he kharadla hota..
http://reverberatesparks.blogspot.com/2008/02/silent-rain.html
Post a Comment