Monday, December 18, 2006

पाऊस

हे फार पूर्वी कधीतरी लिहीलेलं. परवा पावसाबद्दल लिहीलं तेव्हा आठवलं अचानक:

********************************************
हल्ली पाऊसही पडत नाही पूर्वीसारखा....
पूर्वी आपण भेटल्यावर आलं घातलेल्या चहाचा एक घोटही घेतला नाही, की धो-धो पाऊस पडायला लागायचा!
"आज जरा लवकर जायला हवं," असं म्हणत म्हणत आलेलो आपण दोघेजण मग शांतपणे पावसाकडे बघत बसायचो....
पावसाच्या निमित्ताने का होईना आपल्या भेटीचा वेळ वाढतोय, या कल्पनेने मनोमन सुखावत.
पाऊस थांबायची वाट बघता बघता गप्पा इतक्या रंगायच्या की पाऊस थांबल्याची आठवण फार उशीरा व्हायची!

हल्ली तू येतोस तेच घड्याळाकडे पहात पहात -
चहा घेता घेता पावसाची सर आलीच एखादी, तर तीदेखिल चहा संपता संपताच ओसरते
"पाऊस थांबलाच आहे तर निघूयात... पुन्हा कधी कोसळायला लागेल नेम नाही..." म्हणून निघून जाताना
तुझी पावलं जराही घुटमळत नाहीत
मग मी तुझ्या पाठमोऱ्या सावल्या मनात साठवत राहते.
सारं कसं पार बदललंय...
हल्ली पाऊस तरी कुठे पडतो, पूर्वीसारखा....!

8 comments:

Mukul Hinge said...

Kya baat hain!

प्रिया said...

धन्यवाद, मुकुल! :-)

सर्किट said...

फ़ारच सुंदर लिहिलयेस. :) व्हेरी टची!

ह्या नंतरच्या पोस्ट मधले फोटो ही चांगले आले आहेत.

Abhijit Bathe said...

surekh.

abhijit said...

अजून एक अभिजित!

छान लिहिलंय...

प्रिया said...

धन्यवाद सगळ्यांना! :)

स्वाती आंबोळे said...

वा! मस्त कविता!
सखीप्रिया ना? :)

प्रिया said...

ho :)