Sunday, March 4, 2007

असंही मराठी (?!)

हल्ली एकेकाचं मराठी ऐकून मला भयंकर नवल वाटतं! हिंदी नाहीतर इंग्रजीचं शब्दशः भाषांतर करून मंडळी 'मराठी' त बोलत असतात. आणि बरेचदा हे हिंदी करण जोहर, यश चोप्रांच्या सिनेमातून नाहीतर एकता कपूरच्या मालिकांमधून शिकलेलं असतं! मी फार शुद्ध बोलते किंवा लिहीते असं नव्हे, पण हे असलं 'हिंदी सिनेमाळलेलं' मराठी माझ्या फार म्हणजे फारच डोक्यात जातं!

आमच्या इथे जी अगदी मोजकी मराठी टाळकी आहेत, ती सगळीच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतली असल्याने मला बऱ्याच वेगवेगळ्या प्रादेशिक बोली ऐकायला मिळतात. माझ्या अगदी पुणेरी वळणाच्या (त्यांच्यामते) 'साजूक तुपातल्या' मराठीची जरा चेष्टाच होते इथे. "काय त्रांगडं आहे!" किंवा "चहा घेणार का?" , "आज एक-दोन फुटकळ कामं आहेत", "आज ऑफिसमध्ये धुमश्चक्री चालू होती", "जेवायला पानं घ्यायची का?", "पेल्यातलं पाणी संपलंय..." - अशी वाक्य माझ्याकडून ऐकायला त्यांना भारी मौज वाटते! प्रादेशिक बोलींबद्दल मला आदर आहे. नव्हे, त्या ऐकायला मला आवडतातही. एखादा मुंबईकर जेव्हा "चाय पिलीस का?" विचारतो तेव्हा तीदेखिल हिंदीमिश्रीत असली, तरी त्यांची भाषाच असते. नागपूरकडचं "काय दिमाग खराब करून राहिलायस बे!" किंवा सोलापूरकडचं कानडीमिश्रीत मराठी हे सगळं छान! अगदी आपलं कॉलेजमधलं "अरे, ते सर कसले अशक्य चांगलं शिकवतात ना!" किंवा "त्याच्या कन्सेप्ट्स अगदी वाईट क्लिअर असतात यार!" या भाषेला सुद्धा स्वतःचं असं सौंदर्य आहे. पण ही भाषा....?!

साडी 'घालतात' की 'नेसतात'? साडी म्हणजे काय शर्ट आहे का 'घालायला'? 'झाडू मारतात' की 'झाडून घेतात'? "माझं पेन चालत नाहीये" असं म्हणायचं, की "माझं पेन काम करत नाहीये" (Word-to-word translation of "My pen doesn't work" ) म्हणायचं? कुणी रुसल्यावर आपण त्याची 'समजूत काढतो' की त्याला 'मनवतो'? 'जेवण बनवतात' की 'स्वयंपाक करतात'? लग्न 'ठरतं' की 'पक्कं होतं'? अंज्ली, मंग्ला, मान्सी, शाल्नी, शाम्ली ही कसली नावं? रेडिओ वर गाणं, किंवा टी.व्ही. वर सिरीयल 'लागते' की 'येते'? रिझल्ट 'लागतो' की 'बाहेर येतो'? रिझल्ट चांगला लागल्यावर आपल्याला 'आनंद' होतो की 'खुशी' होते'? मग आपण 'आनंद साजरा करतो' की 'खुशी मनवतो'? खूप सामान भरल्यावर बॅग 'भारी' होते की 'जड' होते? ती उचलायला मी तुला मदत करू, की मी तुझी मदत करू? एखाद्यावर विश्वास ठेवतात की त्याचा विश्वास करतात? परवा तर एकाने "I'll catch you later" चं सरळ मराठीत भाषांतर करून "मी तुला नंतर कधीतरी पकडतो.." असं म्हटलेलं ऐकलं, आणि माझे कान धन्य झाले!

काय म्हणावं या भाषेला?

22 comments:

Yogesh said...

:)

http://www.loksatta.com/lokprabha/20070309/grafity.htm

प्रिया said...

योगेश, लिंक नीट दे ना! चालत नाहीये ती...

प्रिया said...

hmm... link ughaDlee, paN font disat naahiye. kaay karaaycha?

स्नेहल said...

खरं आहे गं. हे असं धेडगुजरी मराठी नको वाटतं अगदी...

ashley said...

priya,
badalty amarathibhasheche nirikshanche ani tyachi mandani uttam kelit

kitihi hindi cineme yeoun javot pan marathi nehmich abadhit rahil.aapnhi marathi bhasha blogging chya madhaymatun abadhit thevatch ahot ki.
aaj marathi Tech-marathi zaliy!
shevti kay Thech lagali ki aapan"Aaai g!"ch karato na


hehe ..te sadi ghalane ani nesne yatla farak amal ajunhi kalala nahiye
aso!
asech chan chan lihit raha

Ashwinita.ka. me veleabhavi marathitun lihile nahi pan dekhivyapeksha bhavna shresht nahi ka

Meghana Bhuskute said...

kharay. santap santap hoto!

pan ha asa prabhaw padan apariharyach asat na? yahi transition phase'madhun baher padel ki apali bhasha (ani apal tichyawarach prem!) sashakt asali tar.
tyasathi chalawali karun wa tharaw mandun kay honar? bhasha lokanchi. ti tyana hawi tashi tyani waparawi. tyatoon ghadat- wadhat geli nahi, tarch bhasha mrut samjaychi ki. erwi nahi.

Yogesh said...

ti link ie madhye open keli tar neet disel... maybe loksatta cha dynamic font install karava lage.
firefox madhye disat nahi

शैलेश श. खांडेकर said...

सुंदर लेख!

लहानपणी 'श' आणि 'ष' चे वेगवेगळे उच्चार करण्यासाठी 'शाळा' आणि 'षटकोन' या शब्दांची पारायणे करायचो त्याची आठवण झाली, :)

वैविध्य हे मराठीचं एक सामर्थ्य आहे असंही वाटतं.

Unknown said...

hi priya,
he aapla marathi mhanje " nalachya bajula talachi kholi sarakha aaqhe". i trully agree with you.

Kaustubh said...

:)

माझा एक इंदौरचा (नवीन इंदूर) मित्र आहे इथे. त्याची मातृभाषा मराठीच आहे. इंदौरला खूप मराठी लोक आहेत. पण आजूबाजूच्या हिंदीच्या प्रभावामुळे माझ्या मित्राची मराठी अगदीच वेगळी आणि मोडकी आहे. :) म्हणजे तो सायकलच्या चाकात वारा भरतो. :D इंदौरला होळीला त्याच्या घरी पुरणपोळी बनते. (आपल्याकडे पुरणपोळी करतात.) :) तो पण तुझ्या मित्रांसारखीच खुशी मनवतो. वर्गात त्याच्या काही गोष्टी समजमधे येत नाहीत (आपल्याला समजत नाहीत) आणि तो परेशान होतो. :) पण गंमत अशी, की आज इतक्या वर्षांनंतरही इंदौरची मराठी मोडक्या स्वरूपात का होईना टिकून आहे. आजही अगदी आपल्यासारखेच सगळे सण मराठी पद्धतीनेच तिकडे साजरे केले जातात.

माझा सांगायचा मुद्दा असा, की अशाप्रकारे विचित्र मराठी बोलणाऱ्यांची यात काही चूक आहे असं मला व्यक्तिश: वाटत नाही. आजूबाजूच्या वातावरणातून चांगलं आणि शुद्ध मराठी त्यांच्या कानावर पडत नसेल तर योग्य मराठी कसे शिकणार ते? सध्याच्या दिवसांत असं होणं अगदी स्वाभाविक आहे. मराठी ही शुध्द स्वरूपात टिकवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पण काळानुरूप भाषेत होणारे बदलही अपरिहार्य वाटतात मला. थोडक्यात या विषयाबाबत मी थोडासा संभ्रमातच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा विषय मनात घोळतोय. कधीतरी मीसुद्धा लिहीन सविस्तर.

प्रिया said...

प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार!

कौस्तुभ, तू म्हणतोयस ती इंदौरी भाषा मी उल्लेखलेल्या 'प्रादेशिक बोलीं'पैकीच म्हणता येईल ना! आजूबाजूच्या इतर भाषांचा परिणाम आपल्या बोलीवर होणं स्वाभाविक आहे. पण 'सदाशिव पेठ, पुणे - ३०' किंवा 'एरंडवणे, पुणे - ४' असा पत्ता लावणारी मंडळीदेखिल असं बोलायला लागल्यावर ही भाषा 'धेडगुजरी' वाटू लागते. या मंडळींच्या घरी आई-बाबा, आजी-आजोबा शुद्ध बोलतातच ना? शाळांतून, पुस्तकांमधून 'चांगलं' मराठी शिकवलं जातंच ना.... पण हल्ली घरचे लोक किंवा शाळेतल्या शिक्षकांपेक्षा सिनेमा आणि टी.व्ही. मालिकांचा जास्त प्रभाव असतो की काय कोण जाणे? काळानुरूप भाषेत बदल होणारच, त्यात वाद नाही. किंवा "मराठी भाषेचं आता कसं होणार?", "हल्लीच्या पिढीला भाषेची कशी जाण नाही.." असलं काही मला म्हणायचं नाही. वर अश्विनी म्हणतेय त्याप्रमाणे माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मराठी 'अबाधित' ठेवण्याचा कुठलाही प्रयत्न मी करतेय असंही नाही. मीही बोलताना आणि लिहीतानादेखिल कित्येक इंग्रजी शब्दांचा बेमालूमपणे वापर करतेच की! पण आपण घरी लहानपणी जसं बोलायला शिकलो, जे शब्द वापरत होतो, शाळेतल्या पुस्तकांतून जे वाचत होतो, निबंधात जे लिहीत होतो ते सगळे विसरून अचानक ही 'सिनेमाळलेली' भाषा आपल्या तोंडात कुठून आली याचंच मला नवल वाटतं! ही 'तुमची' भाषा नाहीये हे तुमच्या बोलण्यातनं लगेच जाणवतं, आणि मग स्नेहल म्हणते त्याप्रमाणे ती 'धेडगुजरी' वाटते.

असो. 'शुद्ध भाषा' वगैरे खरंतर माझ्या अवाक्याबाहेरचे विषय आहेत! :) काय शुद्ध आणि काय अशुद्ध या संभ्रमात मीही आहेच! पण या बाबतीत जे मनापासून वाटलं ते लिहीलं. प्रियंभाषिणीने या विषयावर काहीतरी interesting लिहीलंय, आताच पाहिलं. वाचायला हवं. तूही लिही जे काही मनात घोळतंय ते. वाचायला आवडेल :)

Mrinal said...

Nice anecdotes.

BTW Sadashiv Peth, Pune -30 or Erandwane , Pune - 4 ithe rahnare lok jevha 'amhi khushi manavto' ase mhantat.. tevha te bahutek hindi bolaicha prayatna karat astil... tya Joshi buanchya - Peru ki baag se davikade walo - type :)

Kaustubh said...

अच्छा. माझा गोंधळ झाला थोडासा. माझा समज होता की, अनेक वर्षं अमेरिकेत स्थायिक झालेल्या किंवा शुद्ध मराठी कानावर न पडलेल्या इतर लोकांबद्द्ल तू बोलत आहेस. पण पुण्यात राहिलेली, वाढलेली मंडळी जर अशाप्रकारे मराठी बोलत असतील तर मग खरोखर अवघड आहे.

मी सहमत आहे तुझ्या मताशी.

Monsieur K said...

i am one of the species who belongs to the "erandavane, pune 4" class. 5 varsha punyaa baaher raahun, maajhi maraathi aata kashi jhaali aahe, maajha malaach maahit aahe :D
why just marathi, even my hindi has now gone for a toss, having lived & interacted with bengalis & gults in the last one year :))
i am hoping my english remains unaffected.
pan tu mhantes tey barobar aahe - it is indeed a shame that we are ourselves not able to keep our language pure in its conversational form. :(

Tushar said...

Brilliant! Got this link from one of my friends:) and it is worth the time!

HAREKRISHNAJI said...

पुन्ह्या याल तेव्हा जेवायलाच या. असे केव्हा एकायला मिळ्ते की नाही.

HAREKRISHNAJI said...

गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना नवे वर्ष सुखसमृद्धी व भरभराटीचे जावो.

itskary said...

now i know why am i so scared to talk to you in marathi! I wud also say, translated version of "my pen doesnt work" .. and may be "sadi ghalNe" :P

i hope an english comment has pissed you off enough! hehe

but atleast this wasnt minglish :D

Samved said...

स्नेहलच्या ब्लॉग वरुन ही link मिळाली. आज सुट्टीच्या दिवशी ब्लॉग वाचणे हाच कार्यक्रम आहे आणि आता मी आजचा दिवस सत्कारणी लागला असं जाहीर करणार आहे. तुझा ब्लॉग "वाईट्ट चांगला" आहे!!!!!!!

सर्किट said...

hmm, kharaye. pan nehemich samoracha he muddam karat nasato, ani sumare 90% jananna tyanchya bolanyatali chuk dakhavun dili tar te awaDatahi. tar apaN ekmekanchya asha chuka dakhavun, sudharavayacha prayatn chalu thevayacha, marathi bhashechya dirghayushyasathi. ajun dusara kay karanar?

Dk said...

काय म्हणावं या भाषेला>>> aataa kaay mhnnaar tu he evdh mhtlys ki! (ki lihilys) :D

sujata said...


marathi bhasha aahech aashi
valavi tashi valte