Friday, November 24, 2006

कश्ती का खामोश सफर है...

संध्याकाळची वेळ, गार वारा, मावळतीकडे झुकणारा सूर्य, नदीचा शांत प्रवाह, एका नावेत ते दोघेजण. त्याला तिला काहीतरी सांगायचंय, पण कसं सांगावं ते कळत नाहीये. त्याला काय सांगायचंय ते तिला चांगलंच माहित आहे, खरंतर तो बोलण्याची ती आतुरतेने वाटच बघतीये... तो प्रस्तावना करतो -

कश्ती का खामोश सफर है, शाम भी है, तनहाई भी
दूर किनारे पर बजती है लहरोंकी शहनाई भी
आज मुझे कुछ कहना है
आज मुझे कुछ कहना है

'गर्लफ्रेंड' चित्रपटातलं हे गाणं. किशोर कुमार आणि सुधा मल्होत्राच्या आवाजातलं. हे गाणं ऐकल्या ऐकल्या जाणवते ती त्यातली 'शांतता'.... अव्यक्त भावनांमुळे किंवा त्या व्यक्त करता येत नसल्यामुळे निर्माण होणारी शांतता. पण ही शांततादेखिल नादमय आहे. अंगावर शहारा आणणारा गार वारा, लाटांचा हळुवार, लयबद्ध आवाज यांची सोबत आहेच या शांततेत... पण त्याहूनही नादमय आहे ती दोघांनाही ठाऊक असलेली एकमेकांच्या मनातली खळबळ! आता फक्त ती शब्दांत व्यक्त कशी करायची, आणि कुणी आधी करायची हा प्रश्न आहे! :-) "तू आधी बोलतोयस की मीच बोलू.." हे ठरत नसल्यामुळे अव्यक्त असलेली ती नाजूक भावना! अतिशय कमी, पण सुंदर पार्श्वसंगीत आणि किशोर कुमार व सुधा मल्होत्राचे हळुवार आवाज, या सगळ्या परिस्थितीच्या काव्यमयतेला हातभार लावतात. ते दृश्य अक्षरशः डोळ्यांपुढे उभं राहतं.

त्याने प्रस्तावना तर गेली, पण त्यापुढे काही सरकत नाहीये... :-)

आज मुझे कुछ कहना है
लेकिन ये शर्मिली निगाहें मुझको इजाजत दे तो कहूं
खुद मेरी बेताब उमंगे थोडी फुरसत दे तो कहूं
आज मुझे कुछ कहना है...

त्याच्या मनात जे आहे, तेच तिच्याही मनात आहे. त्याला ते व्यक्त करता येत नाहीये, हेही तिला कळतंय. मग ती म्हणते, "Umm... let's try to help him!" ;-)

जो कुछ तुमको कहना है वो मेरेही दिलकी बात न हो
जो है मेरे ख्वाबोंकी मंजिल, उस मंजिलकी बात न हो

तिच्याकडून एवढा encouraging response मिळूनसुद्धा अजून काही याचा बोलायचा धीरच होत नाहीये... :D

कहते हुए डर-सा लगता है, कहकर बात न खो बैठूं
ये जो जरासा साथ मिला है, ये भी साथ न खो बैठूं

आता मात्र ती जरा वैतागते - बोलून टाक की रे एकदाचं! अजून किती झुरवशील मला...

कबसे तुम्हारे रस्ते पर मैं फूल बिछाए बैठी हूं
कह भी चुको जो कहना है मैं आस लगाए बैठी हूं....

आता आपल्या मनात काय आहे, हे तिला कळलंय, हे त्याला कळलंय! :-) तिच्याही मनात तेच आहे, हेही कळलंय. थोडक्यात म्हणजे, दोघांना एकमेकांची 'दिल की बात' कळली आहे. मग आता जे बोलायचंय ते तो कसं चतुरपणे टाळतो पहा:

दिलने दिलकी बात समझ ली, अब मुंहसे क्या कहना है
आज नहीं तो कल कह लेंगे, अब तो साथही रहना है!

तिला मात्र ते त्याच्या तोंडून ऐकायचंच आहे... तिच्या

कह भी चुको... कह भी चुको जो कहना है

या लाडिक आग्रहाला तो गालातल्या गालात हसून उत्तर देतो,

...छोडो अब क्या कहना है...


खरंतर हिंदी सिनेमातली किती stereotypical, 'filmi' situation आहे ही. पण याला वेगळेपणा, अधिक मोहकपणा आणतात साहिर लुधियान्वीचे साधे, सोपे पण नेमके शब्द... आणि त्यांची सहज मांडणी. नेहमीच्या अंतरा-मुखडा pattern पेक्षा जरा वेगळी. सोपे आहेत, म्हणूनच ते शब्द जास्त भावतात, appeal होतात. दोघांमधला खराखुरा संवादच ऐकतोय असं वाटतं हे गाणं ऐकताना. साहिर सोडून दुसरा कुठला कवी या situation ला इतक्या मोहक पद्धतीने मांडू शकला असता असं वाटत नाही. ऐकल्यानंतर बराच वेळ लाटांचा लयबद्ध आवाज कानात घुमत राहतो... आणि गार वारा केसांतून फिरल्यासारखं वाटत राहतं!

7 comments:

प्रिया said...

गाण्याचा असा 'post mortem' करण्याची खोड मला गिरीराज कडून लागली. :D

त्याने लिहीलेलं 'रिमझिम गिरे सावन', 'हमें तुमसे प्यार कितना' आणि अलिकडचं 'Sweet Romance' वाचून, आपल्याला आवडलेलं एखादं गाणं आणि त्यातली आपल्याला भावलेली सौंदर्यस्थळं, इतरांशी अशाप्रकारे share करण्याची कल्पना मला फार आवडली. त्यातूनच हे लिहीलं गेलं... कुणाला गाण्याची अशी चिरफाड केलेली न आवडल्यास, you know whom to blame! :D

गिऱ्या, ~D रे! :)

गिरिराज said...

गपे!
ऐकायला हवे हे गाणे आता!खूपदा अशी गाणी तितकी प्रसिद्ध नसल्याने माहीत किंवा ऐकलेली नसतात आणि नेमका हाच गुण त्यांच्या सौंदर्याला कारक ठरतो.असो.

आणि साहीरबद्दल तर बोलयलाच नको... काय काय कल्पन वापरतो हा माणूस!आता 'फ़ैली हुयी है..' बद्दल लिहून काढ पाहू! :)

Priti said...

खरय.. याच्या ब्लोग वर बरेच्दा वाचलय.. पर्वा आई ला "आये तुम याद मुझे" वाचायला दिलेलं .. तिला पण आवड्ल रे..
ताई, छान लिहीलय .. तू इथे होतीस तेव्ह ते गाणं मी फारस ऐकल नसेलही पन तू तिकडे गेल्यानंतर तू ऐकायचीस ती सगळी गाणी अगदी नियमितपणे ऐकते मी... :)

Unknown said...

vaa chhaan lihile aahe. ganyache bol faar avadale. ata kuthun tari he gaane milavun aikle pahije. :)

Kaustubh said...

किशोर कुमार म्हणजे देवासमान आहे माझ्यासाठी. त्यातून हे गाणं म्हणजे फार फार आवडीचं. पण या गाण्याचे गीतकार वगैरे माहिती नव्हते मला. तुझा अभ्यास मोठा दांडगा दिसतोय. :) छान !

Unknown said...

majha gaNyancha stock sagLa color jamnyatla. tujhyach kadun mala B&W gaaNi kaLtayet.

Btw, this one is really beautiful.The song as well as description.

Sumedha said...

Kaustubh, are jewhA abhyAs karAyachA tewhA TawALakyA kelyA, ANi hA asA "abhAyAs"...

baki chchan ihile aahes ho Priya ;)